नांदेड(प्रतिनिधी)-व्हाईट कॉलर क्रिमिनल या पध्दतीने जनतेला महाराष्ट्र अन्नदाता सेवा केंद्र अशा नावाची भुल देवून जनतेला आणि या संस्थेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना 1 कोटी 85 लाख 37 हजार 754 रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन जणांना पकडल्याची माहिती पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी दिली. आज बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधिक्षकांसोबत अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे यांची उपस्थिती होती. पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2023 मध्ये पोलीस ठाणे वजिराबाद येथे हा गुन्हा दाखल झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, धार संचलित महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र असे या संस्थेचे नाव होते. या संस्थेच्यावतीने असे जाहीर करण्यात आले होते की, 1100 रुपये भरले तर 30 किलो गहू, 25 किलो तांदुळ, 10 किलो साखर, 10 किलो पोहे, 5 किलो शेंगदाने. तसेच 1200 रुपये भरले तर 60 किलो गहू, 25 किलो तांदुळ. 30000 रुपये भरले तर इलेक्ट्रीक स्कुटी. 2200 रुपये भरले तर शिलाई मशीन, लॅपटॉप दिले जाईल. विधवा महिलांनी 1200 रुपये भरले तर एका वर्षासाठ ी 10000 रुपये विधवा पेन्शन दिली जाईल असा खोटा प्रचार करून जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पैसे भरून घेतले. ती रक्कम 1 कोटी 85 लाख 37 हजार 754 रुपये आहे. या गुन्ह्यात अगोदर पोलीसांनी माया गौतम खिल्लारे हिला जून 2025 मध्ये अटक केली होती. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणातील बाबासाहेब शंकर सुतारे (39), सोनाली विजयराव बाजड (29) रा.धार ता.औंढा नागनाथ जि. हिंगोली या दोघांना पकडण्यात आले आहे. या गुन्ह्यात गुंतवणूकदारांची फसवणूक प्रतिबंधक कायदाही जोडण्यात आला आहे. आर्थिक गुन्हा शाखेत तर अत्यंत दबंग पोलीस उपनिरिक्षक नांदेड जिल्ह्यासाठी उपलब्ध आहेत. ते या गुन्ह्याचा उत्तम तपास करतील. या दोन आरोपींना पकडण्यामध्ये रविशंकर बामणे, शेख अजहरोद्दीन, सुधाकर देवकते, दिपक ओढणे यांनी मेहनत घेतली. Kanthak Suryatal Post Views: 2,179 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 14 गुन्हे 7 आरोपी जवळपास 7 लाखांचा मुद्देमाल जप्त; नांदेड पोलीसांची कामगिरी मतिमंद विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी ‘दिशा’ प्रकल्प प्रभावी – रूपाली कांबळे