नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील वाहतुक पोलीसांनी आपल्या मोबाईलवर काढलेले वाहनांचे फोटो चुकीच्या पध्दतीने चलन जनरेट करण्यासाठी वापरले तर त्यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही होईल असे आदेश अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) प्रविण साळुंके यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त ठाणे शहर, पुणे शहर, नवीन मुंबई, नागपूर शहर, पिंपरी चिंचवड, नाशिक शहर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर शहर, अमरावती शहर, मिरा-भाईंदर-वसई-विरार, लोहमार्ग मुंबई तसेच पोलीस अधिक्षक आहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपुर, जालना, धाराशीव, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, गडचिरोली, गोंदिया, नागपूर ग्रामीण, धुळे, जळगाव, नाशिक ग्रामीण, नंदुरबार, रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग, ठाणे ग्रामीण, पालघर, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा यांच्यासह महामार्ग पोलीस ठाणे पुणे, छत्रपती संभाजीनगर, रायगड व नागपूर परिक्षेत्र यांना हा आदेश संबोधीत करण्यात आला आहे. दि.2 जुलै 2025 रोजी परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी विधान भवनात वाहतुक संघटनांसोबत बैठक आयोजित केली होती. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी नेमण्यात आलेले पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार हे त्यांच्या खाजगी मोबाईलद्वारे एकाच वेळी मोठ्या संख्येने वाहनांचे फोटो काढतात आणि आपल्या सोयीनुसार ईचालन प्रणालीमध्ये अपलोड करून चुकीचे चालान देतात. याबद्दल मंत्री महोदयांनी नाराजगी व्यक्त केली आहे. या अगोदरच स्वत:च्या मोबाईलमध्ये फोटो न काढण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. आताही कोणत्याही पोलीस घटकातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी आ पल्या खाजगी मोबाईलद्वारे फोटो काढून वास्तवीक व ेळ सोडून ते फोटो आपल्या सोयीनुसार ईचालन प्रणालीमध्ये मोबाईलचा फोटो वापरून चुकीच्या पध्दतीने चलन जनरेट करतात. अशा पध्दतीने काम करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांविरुध्द शिस्त भंगाची कार्यवाही करण्यात येईल असे या आदेशात लिहिले आहे. Kanthak Suryatal Post Views: 817 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation “बीजेपीसाठी मतदारांची सफाई? निवडणूक आयोगावर गंभीर आरोप जेव्हा सत्ताधारीच सत्य बोलतो—गडकरींचं विधान आणि त्याचे अर्थ