नांदेड : –ज्येष्ठ साहित्यिक तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ ह्या बालकवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने त्यांची नांदेड आकाशवाणी केंद्रावर एक दीर्घ मुलाखत ध्वनिमुद्रित करण्यात आली आहे. ही मुलाखत प्रसिद्ध निवेदक तथा पत्रकार राम तरटे यांनी घेतली आहे.
या मुलाखतीत जडणघडण, संस्कार, बालसाहित्य आणि बालशिक्षणाच्या क्षेत्रातील अनुभव, वाचनसंस्कृतीच्या आणि लेखनसंस्कृतीच्या विकासासाठी केलेले विविध उपक्रम, आजची शिक्षणव्यवस्था, चांगल्या बालसाहित्याचे निकष, बालसाहित्याचे महत्त्व, आजच्या काळात बालसाहित्याची प्रस्तुतता इ. विविध विषयांवरील प्रश्नांना डॉ. सुरेश सावंत यांनी मनमोकळी उत्तरे दिली आहेत. ही. मुलाखत मंगळवार, दि. ८ आणि बुधवार, दि. ९ जुलै रोजी सकाळी ८. ४० वाजता दोन भागांत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचा लाभ घेण्याचे आवाहन आकाशवाणीने केले आहे.