नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन क्रेकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई करत गुरुवारी (३० एप्रिल) शहरातील तीन ठिकाणी अवैध मटका व जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत १८ आरोपींविरोधात गुन्हे दाखल करून एकूण ५५,४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस ठाणे नांदेड ग्रामीण, इतवारा, शिवाजीनगर येथील वेगवेगळ्या ठिकाणी हे अड्डे सुरू होते. याप्रकरणी अनुक्रमे गुन्हे क्रमांक ४८३/२०२६, १३८/२०२६ व १८७/२०२६ (कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार अधिनियम) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. विशेषतः शिवाजीनगर येथील दातार चौक परिसरातील पान टपरीजवळ मटका खेळताना चार जणांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून २४,५६० रुपयांचा मुद्देमाल (रोख, जुगाराचे साहित्य, मोबाइल) जप्त करण्यात आला. या अड्ड्यातील मूळ सुत्रधार शेख मुजाहीद शेख अहमदमिया (सिध्दार्थपुरी, चौफाळा) याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला.जप्त मुद्देमालामध्ये रोख रक्कम, पत्ते, मोबाइल फोन तसेच जुगारासंबंधी इतर साहित्याचा समावेश आहे. पोलिस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, महेश कोरे, मिलिंद सोनकांबळे, दारासिंग राठोड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांनी ही मोहीम यशस्वी केली. पोलिस अधीक्षकांनी या पथकाचे कौतुक केले आहे. आरोपीची नावे (१८ जण) रमाकांत विड्डल जमदाडे, राहुल भिमराव चौंतंते , मोहम्मद असलम मोहम्मद अहेमदमियाँ, मोहम्मद नजफअली मोहम्मद याकुबअली, गौतम अशोक हातवळणे, शेख मुजाहीद, दिलीप अमरचंद चौधरी, संतोष सुभाष कडपे, कन्हैया यादव, रवी शिंदे, मोहम्मद अल्पेकरार, शेख सफदर, सय्यद अन्वर सय्यद उमर, राजू, अमेर खॉन सादीक खॉन, दत्ता, शेख युनुस शेख युसुफ, अब्दुल अब्बास गफुर. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध जुगार किंवा अन्य बेकायदेशीर कृत्यांची माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांना कळवावी. Kanthak Suryatal Post Views: 1,041 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पवन खेडा यांना सर्वोच्च दिलासा म्हणजे न्याय व्यवस्था अद्याप जिवंत पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू : पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीला पालकमंत्री अतुल सावे यांची ग्वाही