नांदेड (प्रतिनिधी) – 4 एप्रिल 2026 रोजी शहरातील डी-मार्टजवळ अरिजितसिंग उर्फ प्रफुल्ल गजानन चव्हाण या युवकाचा खून झाला होता. दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीदरम्यान दुसऱ्या गटातील सय्यद आवेज सय्यद खलील (27) व मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख (23) यांचा देखील मृत्यू झाला होता. मृत झालेले हे दोघे आज गुन्हा क्रमांक 172/2026 मध्ये आरोपी म्हणून नोंद आहेत. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी जयकुमार उर्फ सोनू कैलास राऊत (23) आणि शाकेर खान रशिद खान (30) यांना अटक केली होती. तसेच आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी दिग्विजय गणेशराव नारगुडे (22) व मन्मथ वसंतराव मंगरुळे (25) यांनाही अटक करण्यात आली होती. यानंतर शेख शाहरुख उर्फ कबुर शेख अजगर (29) आणि शेख उबेद शेख अजगर (23) या दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांना 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, वाराणसी येथून आणलेले आरोपी साईसिंह उर्फ साईलाला दिपकसिंह गहेरवार (26) व नितेश परमेश्वर इंगळे (22) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्यांना उद्या 2 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर आहे. भाग्यनगर पोलिसांनी काल या प्रकरणातील नववा आरोपी गौरव सिंह दीपकसिंह गहेरवार (29) याला अटक केली. तो साई उर्फ साईलाला याचा मोठा भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली.अरिजितसिंग हत्या प्रकरणातील नववा आरोपी गौरव सिंह याला न्यायालयाने कोठडीत पाठवले आहे. पुढील तपास सुरू आहे. संबंधित बातमी .. अरिजितसिंगच्या मृत्यू प्रकरणातील साईलाला आणि इंगळेला चार दिवस पोलीस कोठडी Kanthak Suryatal Post Views: 1,412 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation वाजेगाव ग्रामपंचायतीत २.८४ कोटींचा गैरवापर; सरपंच पोलीस कोठडीत; दोन आरोपी ग्रामसेवकांना शोधणे आहे मजदुर दिवस पर भारत सरकारने बढ़ाये सिलेंडर के दाम