नांदेड – श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी उद्या नांदेडचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण व लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे माळेगाव तीर्थक्षेत्राला २५ डिसेंबरला दुपारी 2 वा. आढावा बैठक घेणार आहेत. सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माळेगाव येथे बोलवण्यात आले आहे. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळेगाव येथील यात्रेला 29 तारखेपासून सुरूवात होणार आहे. 29 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत विविध आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या परंपरेनुसार व निर्धारीत हे कार्यक्रम होणार आहेत. तथापि या ठिकाणी येणाऱ्या लाखोच्या संख्येतील श्रद्धाळू भाविक व यात्रेकरूंचा ओघ बघता प्राथमिक सुविधा चौख असाव्यात यासाठी हे आयोजन असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी यासंदर्भात संबंधित सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,311 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation Giriş – En İyi Gambling Oyna ve Kazan! अडचणीतील महिलांनी निवाऱ्यासाठी महिला राज्यगृहाशी संपर्क साधावा