नांदेड(प्रतिनिधी)-एका हॉटेलमधून चोरट्यांनी 2 लाख 11 हजार रुपये किंमतीच्या विदेशी दारुच्या बॉटल्या चोरून नेल्या आहेत. ल्याहारी ता.हदगाव येथील ज्ञानेश्र्वर विठ्ठल तिडके यांचे ल्याहारी वाळकी फाटा येथे हॉटेल रानवारा हे बार आहे. दि.2 जुलैच्या रात्री 10 ते 3 जुलैच्या पहाटे 7 वाजेदरम्यान या बारमध्ये घुसून अज्ञान चोरट्यांनी बारमधील 2 लाख 11 हजार 60 रुपये किंमतीच्या विदेशी दारुच्या बॉटल्या चोरून नेल्या आहेत. हदगाव पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 214/2025 प्रमाणे नोंदवली असून पोलीस उपनिरिक्षक नंद अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,132 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कौठा भागाच्या वस्त्यांमध्ये रस्त्याची दुरावस्था सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे यांच्या आंबा बागेला सलग दुसऱ्या वर्षी पुरस्कार