नांदेड(प्रतिनिधी)-एका हॉटेलमधून चोरट्यांनी 2 लाख 11 हजार रुपये किंमतीच्या विदेशी दारुच्या बॉटल्या चोरून नेल्या आहेत.
ल्याहारी ता.हदगाव येथील ज्ञानेश्र्वर विठ्ठल तिडके यांचे ल्याहारी वाळकी फाटा येथे हॉटेल रानवारा हे बार आहे. दि.2 जुलैच्या रात्री 10 ते 3 जुलैच्या पहाटे 7 वाजेदरम्यान या बारमध्ये घुसून अज्ञान चोरट्यांनी बारमधील 2 लाख 11 हजार 60 रुपये किंमतीच्या विदेशी दारुच्या बॉटल्या चोरून नेल्या आहेत. हदगाव पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 214/2025 प्रमाणे नोंदवली असून पोलीस उपनिरिक्षक नंद अधिक तपास करीत आहेत.
2 लाख 11 हजारांची विदेशी दारु चोरली
