नांदेड(प्रतिनिधी)-बाचोटी ता.कंधार येथील साईप्रसाद उत्तमराव वरपडे यांच्या 16 एकर आंब्याच्या बागेला सलग दुसऱ्या वर्षी सेंद्रीय पध्दतीने बागेची वाढ केल्याबद्दल पुरस्कार मिळाला आहे. यदा-कदा तिसऱ्या वर्षी सुध्दा असाच पुरस्कार वरपडे कुटूंबियांच्या आंब्याच्या बागेला मिळाला तर त्यांचे आंबे विदेशात पाठविण्यासाठी पात्र ठरतील.
कृषी दिनानिमित्त सेंद्रीय पध्दतीने शेतीची वाढ करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाला. त्यात साईप्रसाद उत्तमराव वरपडे यांच्या बाचोटी येथील आंब्याच्या बागेला सलग दुसऱ्या वर्षी सेंद्रीय शेतीचा उपयोग केल्याप्रकरणी साईप्रसाद आणि त्यांचे वडील उत्तमराव वरपडे यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा कृषी अधिकारी कळसाईत यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देण्यात आले.
यंदाच्या तपासणीमध्ये वरपडे यांच्या आंब्याच्या बागेला 85 गुण मिळाले आहेत. सलग तिसऱ्या वर्षी अर्थात पुढच्या वर्षी हा पुरस्कार त्यांना मिळाला तर वरपडे यांचे आंबे विदेशात पाठविण्यासाठी पात्र ठरतील. पोलीस उपनिरिक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले उत्तमराव शंकरराव वरपडे यांनी आपल्या सेवानिवृत्तीनंतर शेतीच्या कामात लावलेल्या मेहनतीला आलेले हे यश आहे असे म्हणावे लागेल.
सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे यांच्या आंबा बागेला सलग दुसऱ्या वर्षी पुरस्कार
