नांदेड(प्रतिनिधी)-पाऊस पडल्यानंतर नांदेड शहरातील महानगरपालिकेची खरी अवस्था अनेक जागी समोर आली आहे. त्यातील कठीण परिस्थिती शहरातील कौठा भागात असलेल्या ओम गार्डन ते भार्गव कोचिंग क्लासेसपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर झाली आहे. पण महानगरपालिकेचे याकडे लक्ष नाही. विशेष म्हणजे या रस्त्यावर मल्लनिस्सारण वाहिनी असतांना तो रस्ता खोदून नवीन वाहिनी टाकली जात आहे.
पाऊसाची सुरूवात झाल्यानंतर महानगरपालिकेच्या कामांचे पितळ उघडे पडले. त्यात काही ठिकाणी नवीन रस्ते तयार होत आहेत. त्यामुळे वाहतुक कोलमडली आहे. ते रस्ते तयार करतांना जनतेला त्रास होत आहे. काही ठिकाणी रात्री कामे करण्यात आली. तशीच कामे रस्त्यांची व्हायला हवी. परंतू त्याकडे कोणाचे लक्ष नाही.
शहरातील कौठा भागात ओम गार्डन ते भार्गव कोचिंग क्लासेसकडे जाणाऱ्या रस्त्यावर अगोदरच मल्लनिस्सारण वाहिनी असतांना तो रस्ता खोदण्यात आला आहे. हा रस्ता खोदल्यामुळे या भागातील रहिवासी तर हैराण झालेच आहेत. पण भार्गव कोचिंग क्लासेसकडे जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनींचा त्रास जास्तच वाढला आहे. सध्याच्या परिस्थितीत युवकांना 4 पाऊले पायी चालू वाटत नाही. अशाच परिस्थिती या रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या दुचाकीला अपघात झाला आणि त्यात काही वाईट घडले तर त्याचा जबाबदार कोण ? असा प्रश्न विचारला जात आहे.
कौठा भागाच्या वस्त्यांमध्ये रस्त्याची दुरावस्था
