नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रातील पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वात नांदेड परभणी, हिंगोेली आणि लातूर या चार जिल्ह्यातील पोलीसांनी जून महिन्यात अवैध व्यवसायीकांविरुध्द 2017 गुन्हे दाखल करून 2316 व्यक्तींना आरोपी केले आहे. या प्रकरणात एकूण 6 कोटी 93 लाख 60 हजार 364 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच चार जिल्ह्यांमध्ये 19 अवैध व्यवसायीकांना एमपीएडी कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे.
नांदेड पोलीस परिक्षेत्रातील अवैध व्यवसायीकांचा विमोड करण्यासाठी अवैध व्यवसाय विरोधी अभियान-3 राबविण्यात येत आहे. त्यात जून महिन्याच्या 30 दिवसांमध्ये वेगवेगळ्या अवैध व्यवसायीकांवर खटले दाखल करण्यात आले. त्यात नांदेड-633, परभणी-463, हिंगोली-476 आणि लातूर-415 असे एकूण 2017 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण 6 कोटी 93 लाख 60 हजार 364 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन जणांना पकडून गांजाची वाहतूक करत होते. त्यांच्याकडून 14 लाख 13 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील उपविभाग चाकूर यांनी 1 कोटी 46 लाख 96 हजार रुपयांची वाळू जप्त करून चांगली कामगिरी केली आहे.
अवैध व्यवसायात गुंतलेल्या 19 माणसांना हिंगोली पोलीसांनी हद्दपार केले आहे. 1 जुलै पासून परिक्षेत्रातील अवैध व्यवसायाचा बिमोड करण्यासाठी अवैध व्यवसाय विरोधी अभियान-3 राबविण्यात येणार आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी जनतेला आवाहन केले आहे की, चारही जिल्ह्यातील नागरीकांनी जवळच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयाच्या Nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर चुकीच्या, बेकायदेशीर व्यवसायाची माहिती कळवून अवैध व्यवसायाचा बिमोड करण्यासाठी हातभार लावावा.