नांदेड :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवार (दि.१२) रोजी नांदेड,हिंगोली जिल्हा दौ-यावर येत आहेत. हिंगोली येथील कार्यक्रमासाठी ते येत आहेत. नांदेड विमानतळावर दुपारी सव्वादोन वाजता त्यांचे आगमन होईल. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई येथून दुपारी २:१५ वाजता नांदेड विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर नांदेड येथून मोटारीने अग्रसेन चौक, हिंगोली येथे दुपारी ३ वाजता त्यांचे आगमन होईल. आमदार संतोष बांगर यांच्याकडून आयोजित अग्रसेन चौक येथील कावड यात्रेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहील. त्यानंतर ते सायंकाळी ४:३०वाजता मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील.५.१५ मिनिटांनी ते नांदेड विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करतील Kanthak Suryatal Post Views: 1,190 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation वजिराबाद पोलीसांनी एका चोरट्याकडून 16 चोरीचे मोबाईल पकडले तहसील कार्यालयात अजब प्रकार; सर्वसामान्य राशन कार्ड लाभार्थी मोदक दिल्याशिवाय फायदा मिळवू शकत नाहीय