नांदेड(प्रतिनिधी)-बेकायदेशीर वाळू वाहतुक करणाऱ्या पोलीस पथकासोबत हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माहुर पोलीसांनी चार नावे आणि तीन अनोळखी लोकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अंमलदार पवनकुमार गजानन राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.19 जून रोजी सकाळी 9 वाजेच्यासुमारास मौजे दिगडी(कु) ता.माहुर येथे पैनगंगा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू चोरून घेवून जात आहेत. अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरिक्षक कराड, पोलीस उपनिरिक्षक आनेबोईनवाड व इतर पोलीस अंमलदार तेथे कार्यवाही करण्यासाठी गेले असतांना तेथे हजर असलेले शाकीर खान शाहादत उर्फ शाद खान, बाबर खान शाहादत खान, नंदु अनिल वानखेडे, रफिक नवाद आणि इतर तीन अनोळखी लोक सर्व रा.फुलसांगवी ता.माहूर हे सापडले. त्यानंतर तेेथे सापडलेल्या एक बिना क्रमांकाचा ट्रॅक्टर, एक दुचाकी, पोलीस ठाण्यात घेवून जात असतांना या सात जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून पोलीसांच्या कामात अडथळा आणला. माहुर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 92/2025 प्रमाणे दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक आनेबोईनवाड अधिक तपास करीत आहेत.
वाळू माफियांनी पोलीसांच्या कामात अडथळा केला ; सात जणांना विरुध्द गुन्हा दाखल
