नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहराचे विद्रुपीकरण सध्या मोठ्याप्रमाणात सुरू झाल आहे. नांदेड शहर हे जिल्ह्याच ठिकाण म्हणून राहिल नसून बेशिस्त शहर झाल आहे. शहरातील चौका-चौकात व रस्त्यच्याच्या दुभाजकांवर कोणी याव आणि बॅनर लावून जाव अशी परिस्थिती निर्माण झाली. गुरुवारी दुपारी शहरातील मुख्य चौकात विना परवानगी भले मोठे बॅनर रस्त्यात कोसळले. सुदैवाने कोणताही अपघात घडला नाही. एकंदरीतच आता नांदेडची महानगरपालिका प्रशासन सत्ताधाऱ्यांपुढे लाचार झाले का? असा प्रश्न सर्व सामान्य जनता उपस्थित करत आहे.
शहरात सत्ताधारी पक्षातील नांदेड जिल्ह्याच्या बाहेरचा एखादा साधा लोकप्रतिनिधीही येणार असला तर भले मोठे होर्डिंग लावले जात आहे. काही दिवसांपुर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नांदेड दौऱ्यावर आले असता भारतीय जनता पार्टीकडून जागो-जागी भले मोठे होर्डिंग लावण्यात आले. जणू काही सत्ताधारी पक्षात बॅनर लावण्याची स्पर्धाच निर्माण झाली असे चित्र सध्या नांदेडकरांना बघायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा असल्यानंतर त्यांच्या पक्षाकडून आणि कार्यकर्त्यांकडून जागो-जागी भले मोठे बॅनर्स लावले जात आहेत. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड काही दिवसांपुर्वी नांदेड दौऱ्यावर आले होते. त्यांच्याही स्वागताचे मोठ-मोठे बॅनर लावण्यात आले. आयटीआय ते वजिराबाद चौक अशा दुभाजकात विद्युत खांबावर होर्डिंग लावण्यात आल्या होत्या आणि याच काळात सुसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू झाला. यादरम्यान लावण्यात आलेले बॅनर रस्त्यावर पडले. येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकांना याचा त्रास सहन करावा लागला. असेच आ.बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्तही शहरात बॅनर बाजी करण्यात आली. त्यांचेही बॅनर दुभाजकांवर हेलकावेच खात होते. गुरूवारी तर हद्दच झाली वर्दळीचा रस्ता असणाऱ्या पोलीस अधिक्षक कार्यालयाच्यासमोरील म्हणजे वजिराबाद चौकात भले मोठे भारतीय जनता पार्टीचे बॅनर लावण्यात आले होते आणि थोडासे वारे सुटताच हे बॅनर रस्त्यावर कोळसले. त्या ठिकाणी वाहतुक शाखेकडून लावण्यात आले बॅरीकेट तुटून पडले. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हाणी झाली नाही हे सर्व महानगरपालिकेला कसे दिसत नाही. साधे कोणी धार्मिक बाबतीत बॅनर लावले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याच्याही घटना आहेत. आता या सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या पुढे नांदेड महानगरपालिका प्रशासन लाचार झाले का? असा प्रश्न गुरूवारी वजिराबाद चौकात चर्चिला जात होता.
सत्ताधारी पक्षांपुढे नांदेड महापालिका प्रशासन लाचार झाले का ?
