धर्माबाद ( प्रतिनिधी )-धर्माबाद येथून जवळच असलेल्या तीर्थक्षेत्र बासर येथील गोदावरी नदीत पवित्र स्नान करण्यासाठी हैदराबाद येथून आलेल्या 18 भाविकांपैकी 5 युवकांचा गोदावरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हैदराबाद मधील चिंतल बाजार येथे राहणाऱ्या कुटुंबातील 18 जन बासर येथे दर्शनासाठी आले होते. दर्शनपूर्वी गोदावरी नदीत पवित्र स्नान करण्यासाठी गेले असता त्यातील 5 युवकांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि पाण्यात साचून असलेली वाळूची गाळ खचून गेल्याने ते नदीच्या पात्रात बुडाले हा प्रकार त्यांच्या सोबतच्या इतर नातेवाईक आणि नदी काठी असलेल्या लोकांच्या निदर्शनास आला.
तत्काळ हा प्रकार येथील प्रशासनास कळविण्यात आला.
उपस्थित नागरिक, प्रशासनाचे पथक यांच्या जीव रक्षक दलाचे जवान यांच्या मदतीने नदीत शोध घेऊन या पाच युवकांचे मृतदेह नदीतून बाहेर काढून शव विच्छेदन आणि उत्तरीय तपासणी साठी म्हैसा येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
नदीत बुडून मयत झालेल्या युवकांची नावे पुढील प्रमाणे आहेत राकेश (17), विनोद (18),ऋतिक (१८), मदन ( 17) भरत (18) अशी आहेत.सदरील युवक हे हैदराबाद मधील दिलसुखनगर भागात चिंतलबाजार येथे येथील होते.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.