नांदेड(प्रतिनिधी)-हैद्राबाद येथील सेंट्रल गुरुद्वारा साहिबच्या अध्यक्षाने सर्वसाधारण सभा न घेता सदस्य पदाची फिस अडीच हजार रुपये केली होती. याबद्दल हैद्राबाद येथील शिख भाविकांनी नांदेड येथील पंचप्यारे साहिबान यांच्याकडे अपील आणले. यावर मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी यांच्या अध्यक्षतेत पंचप्यारे साहिबान यांनी हैद्राबाद येथील अध्यक्षाला सर्वसाधारण सभा आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी लावलेली अडीच हजार रुपये फिस रद्द केली आहे.
हैद्राबाद येथे गवलीगुडा भागात सेंट्रल गुरूद्वारा साहिब आहे. या गुरुद्वारातील अनेक भाविक सदस्य सुध्दा आहेत. या गुरुद्वाराचे अध्यक्ष सरदार इंदरसिंघ हे आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांनी गुरुद्वाराच्या कमिटी सदस्यपदी येण्यासाठी फिस 2500 रुपये केली. ही फिस पुर्वी फक्त 100 रुपये होती. झालेल्या या फिस वाढीविरोधात हैद्राबाद येथील अनेक शिख भाविकांनी नांदेड येथे पंचप्यारे साहिबान यांच्यासमोर विनंती केली. तेंव्हा मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांच्या अध्यक्षतेत पंचप्यारे साहिबान यांनी हैद्राबाद येथील गुरुद्वारा अध्यक्ष सरदार इंदरसिंघ यांना अडीच हजार रुपये फिस रद्द करावी आणि गुरुद्वारा सर्व सदस्यांची सर्वसाधारण सभा आयोजित करावी आणि त्यानंतर सर्वसाधारण सभेच्या निर्णयानुसार फिस ठरवावी असे आदेश केले आहेत. याबद्दल तेलंगणा शिख युथ संघटनेने जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांच्यासह पंचप्यारे साहिबान यांना धन्यवाद दिले आहेत. ही माहिती हैद्राबाद येथील सरदार हरमितसिंघ यांनी दिली आहे.
संबंधीत व्हिडीओ….