नांदेड- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे या योजनेतंर्गत पात्र झालेल्या बचत गटाची संख्या उपलब्ध तरतुदीच्या अनुषंगाने अर्जदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने शुक्रवार 9 मे 2025 रोजी सकाळी 10 वा. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे करण्यात येणार आहे. संबंधितांनी या निवडीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याबाबतची योजना शासनाने सुरु केली आहे. शासन निर्णयान्वये या योजनेच्या अटी व शर्ती निश्चित केलेल्या आहेत. Kanthak Suryatal Post Views: 764 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कॉपी प्रकरणात कंधार येथील अध्यापक महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द बारावी परीक्षेच्या निकालानंतरही विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा सुरू