नांदेड :- सन 2024-25 मध्ये राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी.अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिलेली आहे. या योजनेंतर्गत रिक्त असलेल्या जागा भरणेसाठी विद्यार्थ्यांकडून 15 फेब्रुवारी 2025 पासून प्रत्यक्षरित्या व ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी 25 फेब्रुवारी 2025 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. तथापि सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी.अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज लवकरात लवकर आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, ३,चर्च पथ,पुणे -०१ यांचे स्तरावर अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक समाज कल्याण आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 890 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ‘आम्ही असू अभिजात ‘ संमेलन गीताला नांदेडचा संगीत साज ! राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज