नांदेड(प्रतिनिधी)-किनवट येथे चार दुकाने फोडून चोरट्यांनी 1 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्याचा प्रकार घडला आहे.
रोहन अशोक जाधव हे त्यांचे मामा प्रविण इंद्रसेन राठोड यांच्या किनवट येथील श्री मेन्स वेअर या दुकानाचे कामकाज पाहतात. दि.4 फेबु्रवारी रोजी ते आणि त्यांच्या दुकानातील कामगार कैलास भोयर यांनी रात्री 8.30 वाजता दुकान बंद केले आणि घरी गेले. 5 फेबु्रवारीच्या सकाळी 7.30 वाजता त्यांच्या दुकानाच्या शेजारील दुकानाचे मालक शुभम कावळे यांनी दुकान फोडल्याची माहिती दिली. येऊन तपासणी केली असता दुकानातील कपडे आस्थाव्यवस्थ पडलेले होते, सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, सीसीटीव्हीच्या हार्डडीस गायब झाल्या. चोरट्यांनी मागील बाजूचा लाकडी दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. दुकानातील नवीन कपडे, शर्ट, पॅन्ट, अंडर गारमेंट, मनियान असे 1 लाख 50 हजार रुपयांचे साहित्य, 30 हजार रुपये किंमतीचे सीसीटीव्ही व हार्डडिस, एक मोबाईल असे एकूण 1 लाख 90 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. चोरट्यांनी त्यंाच्या शेजारचे दुकान महेंद्र अनिल घुले यांचे ईटली सेंटर फोडले, शुभम चंद्रकांत कावळे यांचे गुरुवर्य ट्रेनिंग फोडले, ओमकांर वडापाव सेंटर फोडले आणि त्यातून काही रोख रक्कम असा एकूण 1 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
किनवट येथे चोरट्यांनी चार दुकाने फोडली
