नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडून चोरट्यांनी 29 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरला आहे. तसेच खानापूर ता.देगलूर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 62 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. दत्तसिटी, गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागे राहणारे कल्याण किशनराव लालोंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घरातील किरायेदार 30 जानेवारीच्या दुपारी 3 ते 31 जानेवारीच्या पहाटे 6 वाजेदरम्यान त्यांच्या घरास कुलूप लावून बाहेरगावी गेले असतांना त्यांचे घरफोडून चोरट्यांनी कपाटातील 21 हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिणे 8 हजार 800 रुपयांचे असा एकूण 29 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी या संदर्भाने गुन्हा क्रमांक 73/2025 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार सोनवणे अधिक तपास करीत आहेत. खानापूर येथील टेलर काम करणारे अशोक नागनाथ विश्र्वकर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 फेबु्रवारीच्या सकाळी 11.30 ते दुपारी 3 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे 62 हजार 500 रुपये किंमतीचे दागिणे चोरून नेले आहेत. देगलूर पोलीसांनी या संदर्भाने गुन्हा क्रमांक 58/2025 दाखल केला आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 905 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महिलांनी स्वत: सक्षम होण्यासाठी प्रयत्नशिल राहावे-डॉ.गर्वितासिंह माता रमाई जन्मोत्सव निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन