नांदेड(प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस पथकाने चिंचाळा फाटा ता.बिलोली येथे तिन जणांना पकडून त्यांच्याकडून आठ तलवारी आणि खंजीर जप्त केले आहेत. तसेच त्यांची दुचाकी जप्त केली आहे. दि.25 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार पाहिजे आणि फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत असतांना बिलोलीकडे गेले होते. त्या ठिकाणी चिंचाळा फाटा येथे त्यांनी एका दुचाकी गाडीवर तिन जण पाहिले. त्या तिघांना थांबवले असतांना त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी खंजरी, असे 8 घातक हत्यार सापडले. एकाच दुचाकीवर टिबल सिट जाणाऱ्या त्या दुचाकीचा क्रमांक टी.एस.16 एफ.ई.6292 ही गाडी सुध्दा जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 65 हजार 500 रुपये आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुमंतसिंग जेलरसिंग ठाक (24) रा.बोधन जि.निजामाबाद, संदीपसिंग दरबारसिंग बावरी (19) रा.बोधन जि.निजामाबाद, संजुसिंग चरणसिंग ठाक(24) रा.बोधन जि.निजामाबाद या तिघांविरुध्द बिलोली पोलीसांनी भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा क्रमांक 16/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार शिंदे हे करणार आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,616 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ‘युवा उमेद’ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे भारताच्या नागरीकांनो तयार रहा; हिंदुराष्ट्राचे संविधान तयार आहे