आज 27 जानेवारी रोजी विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळी अर्थात महु (मध्यप्रदेश) येथून कॉंगे्रस पक्षाचे खा.राहुल गांधी हे संविधान बचाव संघर्ष यात्रेची सुरूवात करणार आहेत आणि आजच दैनिक अमर उजाला यांनी एक खतरनाक बातमी ब्रेक केली आहे. त्यानुसार 12 महिने 12 दिवसात तयार झालेले हिंदु राष्ट्राचे संविधान जे वसुधैव कुटूंबकम या मुळ आधारावर तयार झाले आहे आणि ते महाकुंभ मेळ्यात वसंत पंचमी दिनी अअर्थात 3 फेबु्रवारी 2025 रोजीच्या शुभमुहूर्तावर जनतेसमोर ठेवले जाणार आहे. विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जेंव्हा समितीचे अध्यक्ष पद भुषवले. त्यावेळी त्यांना मनुस्मृतीत संविधान हवे अशा संघर्षाला सामोरे जावे लागले होते. आता नव्या रुपात मनुस्मृतीत अखंड हिंदु राष्ट्राचे संविधान म्हणून समोर आणले जात आहे. याला एका म्हणीप्रमाणे बाटली बदलली दारु जुनीच असे म्हणावे लागेल.महाकुंभ मेळ्यात वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर अर्थात 3 फेबु्रवारी 2025 रोजी अखंड हिंदु राष्ट्राचे संविधान जनतेसमोर ठेवले जाणार आहे. ही बातमी बे्रक केली अमर उजाला या दैनिकाने. 12 महिने 12 दिवसात हे संविधान तयार झाले आहे. उत्तर भारतातील 14 आणि दक्षीण भारतातील 11 विद्वानांनी हे संविधान तयार केले आहे. चार पिठाच्या शंकराचार्यांनी संम्मती दिल्यानंतर हे हिंदु राष्ट्राचे संविधान केंद्र सरकारला पाठविले जाणार आहे. 501 पानांच्या या संविधानात रामराज्य, कृष्ण राज्य, मनुस्मृती, धर्मशास्त्र आणि चाणक्य अर्थशास्त्रावर आधारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. संविधान समितीने काशीविश्र्व हिंदु विद्यापीठ, संपुर्णानंद सांस्कृतीक विद्यापीठ, केंद्रीय सांस्कृतिक विद्यापीठ यातील अनेक विद्वानांनी या संविधानाचे प्रारुप तयार करण्यासाठी मेहनत घेतली आहे. संविधान समितीचे संरक्षक स्वामी आनंदस्वरुपजी महाराज सांगातात की, 2025 मध्ये हिंदु राष्ट्र घोषणेचा संकल्प आहे. यासाठीच तर भाजपाला 400 पार खासदार हवे आहेत. वास्तव न्युज लाईव्हने लोकसभा निवडणुकीपुर्वीच भिती वाटते का मोदीजी का हवेत 400 पार हा मुद्दा विस्तृतपणे मांडलेला आहे. हिंदुराष्ट्र संविधानाने प्रमाणे देश हा गणराज्य मानला जाईल. यात वसुधैवकुटूंबक आणि सर्व्हे सुखीनो सर्व्हे संतु निरामया या शब्दांवर संविधानाचा आराखडा असेल. या संविधानात इतर धर्मियांना विरोध नसणार आहे. या ठिकाणी राहण्याचा सर्वांना अधिकार असेल. पण राष्ट्र विरोधी कामे करणाऱ्यांना कडक शिक्षेचा प्रस्ताव या संविधानात आहे. जो आजच्या कायद्यात सुध्दा आहे. संविधान समितीचे अध्यक्ष डॉ.कमलेश्र्वर उपाश्याय सांगतात की, हिंदु राष्ट्रात प्रत्येक नागरीकाला सैन्य शिक्षण अनिवार्य आहे. अर्थात दररोजच विश्र्व हिंदु परिषदेच्या शाखेत जावे लागेल. हिंदु राष्ट्रात सध्या प्रचलित कर प्रणाली नसेल. अनेक बाबी करमुक्त होतील. कर चोरीवर कडक शिक्षा असेल. शंभवीपिठेश्र्वर आनंद स्वरुपजी सांगतात की, भारताच्या प्रचलित संविधानाने मध्ये आजपर्यंत 300 पेक्षा जास्त दुरूस्त्या झाल्या आहेत. पण आमच्या धमर्र्शास्त्रात एकही दुरूस्ती आजपर्यंत झालेली नाही. आम्ही जगातील इतर देशांना सुध्दा हिंदु राष्ट्र बनविण्यासाठी अपील करू आणि आमच्या कामात सुध्दा मदत मागु. जगात 127 ख्रिचन देश आहेत, 157 मुस्लीम देश आहेत, 15 बुध्दीस्ट देश आहेत. आणि यहुद्यांसाठी इसरायल हा एक देश आहे. संपुर्ण जगात पावणे दोन अब्ज हिंदु आहेत.. पण त्यांचा एकही देश नाही. हिंदु राष्ट्रात लोकसभा किंवा संसद असे नाव नसेल. ते नाव हिंदु धर्म संसद असे असेल. निवडुण येणारा खासदार हा धर्मसांसद असेल आणि त्याच नावाने तो निवडला जाईल. आजच्या परिस्थितीत संख्यप्रमाणे 543 धर्म सांसद निवडले जातील. धर्मसांसद बनण्यासाठी वय कमीत कमी 25 वर्ष असेल. धर्म संसदेत मतदान करणाऱ्या मतदाराचे वय 16 वर्ष असेल. धर्मसंसदेची निवडणुक लढविण्याचा अधिकार फक्त सनातन धर्मियांना आणि भारतीय उपमहाद्विपातील जैन-बौध्द आणि शिख धर्मियांना असेल. म्हणजेच पारसी, ख्रिचन आणि मुस्मीम यांना धर्म संसदेची निवडणुकच लढविता येणार नाही आणि त्यांना मतदानाचा हक्क सुध्दा मिळणार नाही. धर्म सांसद बनण्याची इच्छा असणार व्यक्ती वैद्यकीय गुरुकुलचाच विद्यार्थी असावा लागेल. अयोग्य व अपराधीक वृत्ती असलेले लोक निवडणुक लढवू शकणार नाहीत. निवडूण आलेले धर्म सांसद 2/3 बहुमताने राष्ट्र अधक्ष्याची निवड करतील. धर्म सांसदाला दैनिक, साप्ताहिक, मासिक प्रगती अहवाल सार्वजनिक करावा लागेल. धर्म सांसदाच्या क्षेत्रातील जनता नाराज असेल 50 हजार स्वाक्षऱ्यांचे निवेदन धर्म संसदेला पाठवावे लागेल. धर्म संसद त्यावर जनमत घेईल आणि त्यानुसार जनतेला त्यांनी पाठविलेला आपला प्रतिनिधी अर्थात धर्मसांसद परत बोलावता येईल. राष्ट्राध्यक्षाची निवड गुरुकुलातून होईल. धर्म शास्त्र पारंगत, राज्य शास्त्र पारंगत आणि प्रशासन चालविण्याचा 5 वर्षाचा अनुवभ असणारा व्यक्तीच राष्ट्राध्यक्ष होवू शकेल. युध्दाच्या वेळेस राजाला आपल्या सेन्याचे नेतृत्व करणे आवश्यक असेल. विषय विशेशज्ञ शास्त्राचे ज्ञा असणारा, शुरविर, राज चालविण्यासाठी समर्थ, आणि प्रशिक्षीत व्यक्तींनाच मंत्री पदे देता येतील. हिंदु राष्ट्रात प्राचीन हिंदु न्याय व्यवस्था लागू होईल. भारतीय वैद्यीक गुरुकुलातनू आलेले गुणवत्ता धारक न्यायाधीश पदावर बसू शकतील आणि जलद न्याय देण्याची प्रक्रिया सुरू ठेवतील. या न्याय व्यवस्थेत आरोप खोटा असेल फिर्यादीला सुध्दा दंडात्मक का र्यवाही होईल. पण तो दंड सुधारणात्मक असेल. हिंदु राष्ट्रात शिक्षणासाठी प्राचीन वैद्यीक गुरूकुल पध्दती अंमलात येईल. इंग्रजी माध्यमांच्या शाळा गुरुकुल होतील. शासनाच्यावतीने चालविले जाणारे मदरसे बंद केले जातील. मनु व याज्ञवल्क स्मृतीचा उपयोग शिक्षणासाठी केला जाईल. वर्णनाश्रम व्यवस्था लागूे केल जाईल. आणि जाती समाप्त केल्या जातील. संयुक्त परिवाराला पाठबळ दिले जाईल असे एकंदरीत प्रारुप आहे या हिंदुराष्ट्राच्या संविधानाचे. भारतीय जनता पार्टीला यंदाच्या लोकसभेत 400 पार का हवे होते. हे आता कळायला लागेल. भारतीय जनता पार्टीच्यावतीने विरोधी पक्षांवर ही टिका होत होती की, संविधान बदलण्यायची चर्चा विरोधी पक्ष करत आहेत. ती निवळ अफवा आहे. ही निवळ अफवाच असेल तर भारतीय जनता पार्टी, केंद्र सरकार योगी आदित्यना आणि राष्ट्र स्वयंसवे संघ या तथाकथील हिंदुराष्ट्र संविधानाचा निषेध करतील काय?, बह्ष्किार करतील काय? जर हिंदुराष्ट्राचे संविधान केंद्र स सरकारकडे सादर झाले आणि ते संविधान त्यांनी अभ्यासासाठी ठेवून घेतले. तरी 2035 हे वर्ष येण्याची गरज राहणार नाही. तर 2029 मध्येच ते लागू होईल. कारण त्यावेळी भारतीय जनता पार्टी 500 च्या पार असेल. जनता मग देईल किंवा नाही याचा विषयच आता शिल्लक राहिलेला नाही. कारण मशिन त्यांनाच मते देईल आणि यामुळे आरक्षण सुध्दा जाईलच. तेंव्हा येणाऱ्या भविष्यातील वेळेसाठी भारताच्या प्रत्येक नागरीकाने तयार राहण्याची गरज आहे. सोर्स: न्युज लॉंचर, अशोक वानखेडे, द एक्सरे. Kanthak Suryatal Post Views: 1,667 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने तीन जणांना पकडून घातक हत्यारे जप्त केली सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक आणि त्यांच्या पत्नीविरुध्द 28 लाख 75 हजार रुपये अपसंपदेचा गुन्हा दाखल