नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे 37 पालकमंत्री जाहीर केले आहेत. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे अशा तिघांना दोन जिल्ह्यांचे पालकत्व देण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्याचे पालकत्व अतुल सावे यांना मिळाले आहे. तिन जिल्ह्यांमध्ये सहपालकमंत्री असे पद देण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने जारी करण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(गडचिरोली), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ठाणे आणि मुंबई शहर), अजित पवार(पुणे आणि बीड), चंद्रशेखर बानकुळे(नागपूर आणि अमरावती), राधाकृष्ण विखे पाटील(आहिल्यानगर), हसन मुश्रीफ(वासिम), चंद्रकांत पाटील(सांगली), गिरीश महाजन(नाशिक), गुलाबराव पाटील (जळगाव), संजय राठोड(यवतमाळ), ऍड. आशिष शेलार(मुंबई उपनगर), मंगलप्रभात लोढा(सहपालकमंत्री मुंबई उपनगर), उदय सामंत(रत्नागिरी), जयकुमार रावल(धुळे), पंकजा मुंडे(जालना), अतुल सावे (नांदेड), डॉ.अशोक उईके(चंद्रपुर), शंभुराज देसाई(सातारा), आदिती तटकरे(रायगड), शिवेंद्रसिंह राजे भोसले(लातूर), ऍड.माणिकराव कोकाटे(नंदुरबार), जयकुमार गोरे(सोलापूर), नरहरी झिरवाळ(हिंगोली), संजय सावकारे(भंडारा), संजय शिरसाट (छत्रपती संभाजीनगर), प्रताप सरनाईक(धाराशिव), मकदंर जाधव(बुलाढाणा), निलेश राणे (सिंधुदुर्ग), आकाश फुंडकर (अकोला), बाबासाहेब पाटील (गोंदिया), प्रकाश आबीटकर(कोल्हापूर), माधुरी मिसाळ(सहपालकमंत्री कोल्हापूर), ऍड. आशिष जयस्वाल(सहपालकमंत्री गडचिरोली), डॉ.पंकज भोयर(वर्धा), मेघना साकोरे-बोर्डीकर(परभणी). Kanthak Suryatal Post Views: 2,134 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तत्वनिष्ठ राजकारणी : केशवराव निटूरकर नवीन नांदेड मराठी संघटनेच्या अध्यक्षपदी तिरुपती पाटील घोगरे तर कार्यअध्यक्ष पदी रमेश ठाकूर