नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या गृहविभागाने पाठविलेल्या पत्रानंतर 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता 2 मिनिटे मौन पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात यावा असे परिपत्रक जारी केले आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने जारी करण्यात आलेले हे परिपत्रक देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी 30 जानेवारी रोजी संपूर्ण देशभर सकाळी 11 वाजता 2 मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहण्यात येते. त्यानंतर 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात यावा असे परिपत्रकात नमुद आहे. सकाळी 10.59 वाजेपासून 11 वाजेदरम्यान भोंगा वाजविण्यात येईल. त्यावेळी शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, आस्थापना, शैक्षणिक संस्था, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरीक यांनी 2 मिनिटे मौन पाळावे. सकाळी 11.02 मिनिटांनी मौन संपले यासाठी पुन्हा भोंगा वाजविला जाईल. सर्वांनी योग्य आदराने हे मौन पाळावे असे या परिपत्रकात नमुद आहे. शासनाने संकेतांक क्रमांक 202501151633089007 प्रमाणे शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,118 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी उत्पन्नाची अट रद्द बीड आणि परभणीच्या घटनांसाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती