नांदेड(प्रतिनिधी)-पश्चिम क्षेत्रीय युवक महोत्सव (वेस्ट झोनल स्पर्धा) गुजरात राज्यातील गणपत युनिव्हर्सिटी मेहसाणा येथे नुकत्याच संपन्न झाल्या. महाराष्ट्र,गुजरात,राजस्थान,गोवा आणि मध्य प्रदेश या राज्यांतील ४४ विद्यापीठे सहभागी असलेल्या या झोनल स्पर्धेत हिंदुस्थानी शास्त्रीय स्वरवाद्य (नॉन पऱकशन सोलो) मध्ये एकूण ३० सहभागी स्पर्धकांमधून नांदेडची गुणी कलाकार गुंजन परीनीता पंकज शिरभाते हिने व्हायोलिन वादन सादर करून स्पर्धेत कास्य पदक मिळवून SAARC महोत्सव (दक्षिण एशियाई क्षेत्रीय सहयोग संगठन) मध्ये प्रवेश मिळवला आहे. तसेच नोएडा येथे मार्च महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय युवक महोत्सव स्पर्धासाठी ही ती पात्र झाली आहे. डॉ. गुंजनला तबला ची साथ महाराष्ट्राचा युवा कलाकार पृथ्वीराज देशमुख (स्वप्निल भिसे यांचे शिष्य) यांनी केली होती.
डॉ.गुंजन सध्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत ग्रामीण दंत वैद्यक शास्त्र महाविद्यालय नांदेड येथे दंत वैद्यक शास्त्रचे (बि.डी.एस.) अंतिम वर्षात शिकत आहे.
डॉ.गुंजन ने आपल्या यशाचे श्रेय प्रथम गुरू आणि वडील नांदेड चे सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक पंकज शिरभाते, आजोबा महाराष्ट्र भूषण जेष्ठ कलावंत स्व. पं. वसंतराव शिरभाते, आदर्श क्रीडा शिक्षक असलेली आई सौ. परिनीता आणि सध्या मार्गदर्शन घेत असलेल्या पद्मभूषण डॉ एन राजम यांना दिले आहे.
गुंजन च्या या यशाबद्दल नांदेडच्या जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, नांदेड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार सर, माजी समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, संगीत व सांस्कृतिक क्षेत्रातील डॉ. दि.भा.जोशी, भगवानराव देशमुख, डॉ. जगदीश देशमुख, पंडीत संजय जोशी, सूरमणी पंडीत प्रा. धनंजय जोशी, सुरेश जोंधळे, जयंत वाकोडकर, सौ.राधिका वाळवेकर, सौ. विजया कोदंडे, डॉ. प्रमोद देशपांडे, डॉ. डब्ल्यू एच शेख. (मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूर). बाबाराव इबितवार (अंध विद्यालय वसरणी) प्रशांत गाजरे, प्रा. अशोक ठावरे तसेच दंत वैद्यक शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वूंदा वल्ली भद्राराव, यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.