नांदेड (प्रतिनिधी) नांदेड शहर हादरवून सोडणाऱ्या अरिजीत सिंग चव्हाण खून प्रकरणात आता धक्कादायक घडामोड समोर आली आहे. आधीच अनेक आरोपी पोलीस जाळ्यात अडकले असताना, या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार मानला जाणारा साई उर्फ साईलाला दीपकसिंह गहेरवार (रा. सिडको) हा थेट वाराणसी पोलिसांसमोर हजर झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात सध्या शेख शाहरुख आणि शेख उबेद हे दोन आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या तपासाला वेग आला असतानाच तिसरा मारेकरी स्वतःहून हजर झाल्याने संपूर्ण प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले आहे. आरोपींची साखळी उलगडतच राहिली या हत्याकांडात सुरुवातीला सोनू राऊत आणि सहेर या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तपासाची व्याप्ती वाढवत पोलिसांनी शेख शाहरुख आणि शेख उबेद यांना जेरबंद केले. सध्या हे दोघे पोलीस कोठडीत असून, त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती बाहेर येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मुख्य आरोपी वाराणसीत हजर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कटाचा मुख्य आरोपी मानला जाणारा साई उर्फ साईलाला दीपकसिंह गहेरवार हा वाराणसी पोलिसांसमोर स्वतः हजर झाला. वाराणसी पोलिसांनी तातडीने याची माहिती नांदेड पोलिसांना दिली असून, आरोपीला ताब्यात घेण्यासाठी नांदेडहून विशेष पथक रवाना झाल्याचे समजते. मात्र नांदेड पोलिसांचे पथक परत आले की नाही, आरोपी ताब्यात घेतला की नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलीस अधीक्षकांचे संकेत परवाच घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट संकेत दिले होते की, “या प्रकरणातील उर्वरित आरोपी आमच्या रडारवर आहेत. त्यांनाही लवकरच अटक केली जाईल.” या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य आरोपी स्वतःहून समोर आल्याने तपास निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे मानले जात आहे.दरम्यान, अरिजीत सिंग चव्हाण यांच्या घरातील काही नातेवाईक व संबंधित व्यक्तींनाही नांदेड पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.पोलीस विविध कोनातून तपास करत असून हत्येमागील नेमका कट, आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक वैर यांचा शोध घेतला जात आहे. अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित मुख्य सूत्रधाराने अचानक आत्मसमर्पण का केले? हत्येचा खरा मास्टरमाईंड कोण? आरोपींच्या मागे मोठे रॅकेट आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलिसांच्या पुढील कारवाईवर अवलंबून आहेत. अरिजीत सिंग चव्हाण हत्याकांडाचा तपास आता निर्णायक वळणावर असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित बातमी ….. हल्ला, प्रतिहल्ला आणि रुग्णालयात खून — शहर हादरवणाऱ्या प्रकरणात सहा जणांना कोठडी Kanthak Suryatal Post Views: 2,422 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सुरु झाले मतदान तामिळनाडू आणि बंगाल मध्ये पहिल्या टप्प्याचे : कोणाला निवडावे मतदारांनी पश्चिम बंगाल मध्ये सीआरपीएफ मतदान करीत असल्याचा तृणमूलचा आरोप