माळेगावात पारंपारिक लोककला महोत्‍सवात कलाकारांनी जिंकली रसिकांची मने

*लोककला महोत्सवाचे  आ. प्रंतापरावरा पाटील चिखलीकर यांचे हस्‍ते उद्घाटन*
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा (मिडिया सेंटर),3- महाराष्ट्रातल्या मातीत जन्मलेल्या कलाकारांचा सन्मान करण्यासाठी माळेगाव यात्रेत पारंपारिक कलामहोत्‍सवाची सुरुवात केली आहे. पारंपारिक लोककलांचे संवर्धन व कलाकरांना प्रोत्साहन देणे हे आमचे ध्येय असून, कलाकारांना शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याचे प्रतिपादन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
     माळेगाव यात्रेत आज वैभव असलेल्या पारंपारिक लोककला महोत्सवाचे उद्घाटन आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्‍यात आले, त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्‍हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी ब-हाटे, पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, आनंदराव पाटील ढाकणीकर, शंकरराव ढगे, रोहित पाटील, सचिन पाटील चिखलीकर, नरेंद्र गायकवाड, भगवानराव राठोड, लक्ष्मण भालके, सरपंच प्रतिनिधी हनुमंत धुळगंडे, बालाजी कदम आदींची यावेळी उपस्थिती होती.
     पुढे ते म्‍हणाले, माळेगाव यात्रेत कायमस्वरूपी सुविधा निर्माण करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात येणार असून, जिल्हा नियोजन समितीकडून भरीव निधी उपलब्ध करून घेतला जाईल, असेही ते म्‍हणाले. यावेळी जुन्‍या काळातील तमासगीर अशाताई सुकळकर, शाहीर रमेश गिरी, कलावंत लच्‍छु देशमुख यांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन आ. चिखलीकर यांच्‍या हस्‍ते
       महोत्सवाची सुरुवात शाहीर रमेश गिरी यांच्या महाराष्ट्र गीतने झाली. यावेळी रघुवीर खेडकर नाट्य मंडळ (सातारा), पांडुरंग मुळे नाट्य मंडळ, आनंद लोकनाट्य मंडळ, सविताराणी पुणेकर, हरीभाऊ बडे नगरकर व शिवकंन्‍या बडे नगरगर  यांसह विविध कलाकारांनी गण गवळण, बतावणी, रंबाजी, लावणी व इतर पारंपारिक कला सादर करून रसिकांची मने जिंकली. माळेगाव यात्रेतील पारंपारिक लोककला महोत्सवाने जिल्ह्यातील सांस्कृतिक वारशाला एक नवा आयाम दिला आहे. या महोत्सवातून महाराष्ट्रातील लोककलेचे महत्व अधोरेखित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!