नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली पोलीसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा मारुन 7 जुगाऱ्यांना पकडले असून एक फरार झाला आहे. दोन चार चाकी गाड्यांसह 25 हजार 50 रुपये रोख रक्कम असा एकूण 17 लाख 25 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक शाम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनात बिलोली येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक कमल शिंदे, पोलीस अंमलदार मुद्देमवाड, कठारे, धुप्पटवाड, वनशेट्टे यांनी दि.7 फेबु्रवारी रोजी रात्री 10.30 वाजेच्यासुमारास लोहारगल्ली बिलोली येथे एका घरात छापा मारला. त्या ठिकाणी शेख ईलियास शेख पाशा (30), सुदाम पोशेट्टी मिरले (40), मोहम्मद युनूस मोहम्मद रसुल (55) सर्व रा.निजामाबाद, मोहम्मद इब्राहिम खान (58) रा.मजारुल, धनगरी मुथी रामलू (57) रा.बोधन तालुका, खैरान सोहेल नवाब साहब (52) रा.बोधन, राकेश गंगाराम गोगरोड (26) रा.धोबीगल्ली बिलोली यांना पकडले. यावेळी जुगार ज्याच्या घरात चालू होता तो शेख सादीज उर्फ सज्जुलाल अहेमद हा फरार झाला आहे. पोलीसांनी या ठिकाणावरुन एम.एच.45 एन.7581, टी.जी.16 सी.8078 अशा दोन दुचाकी गाड्या आणि 25 हजार 50 रुपये रोख रक्कम असा एकूण 17 लाख 25 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपअधिक्षक शाम पानेगावकर यांनी बिलोली पोलीसांचे कौतुक केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 749 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मुख्यमंत्र्यांचा मुस्लिमांवर बंदुकीतून निशाणा आणि राजकारणातील ध्रुवीकरणाचा नवा वाद फरांदेनगरमध्ये 1 लाख 63 हजार 600 रुपयांची चोरी