बँकेत एक लाख रुपये जमा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचे पैसे चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-बॅंकेत 1 लाख रुपये भरण्यासाठी गेलेल्या 60 वर्षीय शेतकऱ्याची ती रक्कम कोणी तरी महिला चोरटीने चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे.

60 वर्षीय गणपत लखु जाधव रा.बाऱ्हाळी तांडा ता.हिमायतनगर हे 11 डिसेंबर रोजी 1 वाजता एसबीआय शाखा हिमायतनगर येथे कापसाचे आलेले 1 लाख रुपये भरण्यासाठी गेले असतांना तेथे कोण्या तरी महिला चोरटीने त्यांची ती 1 लाख रुपये रक्कम चोरून नेली आहे. हिमायतनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 289/2024 प्रमाणे दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कोमल अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!