नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड गावातील दिपनगर भागात राहणाऱ्या एका शिक्षकाचे घरफोडून चोरट्यांनी त्यातून 74 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. मुखेड येथील शिक्षक दादाराव गोविंदराव आगलावे आणि त्यांच्या शिक्षक पत्नी दोघे 11 डिसेंबर रोजी सकाळी 9.45 वाजता शाळेत गेले आणि दुपारी 1 वाजता परत आले तेंव्हा त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडलेला होता. घरात ठेवलेल्या कपाटातील सोन्याचे दागिणे 66 हजार रुपये किंमतीचे आणि 8 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 74 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. मुखेड पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 387/2024 प्रमाणे दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 836 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीसाठी रंगतो आहे “रंगीत पाण्याचा खेळ’? बँकेत एक लाख रुपये जमा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचे पैसे चोरले