भारताचे मुख्य निवडणुक आयुक्त राजीवकुमार शकुनी आहेत

जच्या युगात आई-मुलाला मारत आहे. डॉक्टरा रुग्णाला मारत आहेत. काब्यातून कफन बाहेर निघत आहे अशा परिस्थितीत देशाची राजनिती रस्त्यावर आली आहे. राम मनोहर लोहिया सांगत होते, “सडके सुनी होती है तो संसद बे लगाम हो जाती है।’ अशा शब्दांमध्ये महाराष्ट्रामधील निवडणुकांचा आपला आलेख सांगतांना 77 वर्षाचे डॉ.प्यारेलाल गर्ग सांगत होते की, माझ्या या वयात मला असे पाहावे लागेल याची कधीच कल्पना मी केली नव्हती. भारत सरकारमध्ये विशेषज्ञ म्हणून मी काम केले आहे. त्यामुळे मला जास्त वाईट वाटत आहे असे शब्द डॉ.प्यारेलाल गर्ग यांनी एका मुलखतीत वापरले.
डॉ.प्यारेलाल गर्ग यांची ख्याती यासाठी आहे की, मुख्य निवडणुक आयुक्त कार्यालय दिल्ली यांच्या संकेतस्थळावर आणि त्यांच्या ऍपवर सादर झालेल्या आकडेवारीला अनुसरून ते स्वत:ची आकडेमोड करतात आणि निवडणुकीबद्दल आपले विश्लेषण सांगत असतात. त्यामुळे त्यांना निवडणुक वैज्ञानिक असे संबोधले जाते. निलू व्यास यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्र निवडणुकीचा आलेख जनतेसमोर मांडतांना सांगितले की, निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर महाराष्ट्रामध्ये 7.86 टक्के मतदान आणि झारखंड राज्यात 0.83 टक्के मतदान सायंकाळी 5 वाजल्यानंतर वाढले. त्यामुळे 95 लाख 76 हजार मते वाढली.या आकडेवारीनुसार निवडणुक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 288 मतदार संघामध्ये सरासरी 26 हजार 500 मतांची वाढ केलेली आहे. निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर निवडणुकीत झालेल्या मतदानाची टक्केवारी सन 2014, सन 2019 आणि 2024 या तिन्ही वेळेच वाढलेली आहे. मतमोजणी हा सुध्दा एक डेटा आहे. निवडणुक आयोगाच्या डेटाप्रमाणे निवडणुकीत झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यामध्ये एकास आठ असा फरक आहे. महाराष्ट्र्रातील आकोट विधानसभा मतदार संघात झालेले मतदान 2 लाख 36 हजार 234 आहे. मोजलेले मतदान निवडणुक आयोगानुसार 2 लाख 12 हजार 690 आहे. म्हणजे या ठिकाणी 23 हजार 524 मते कमी मोजली गेली आहेत. तरी पण त्या ठिकाणी विजयी उमेदवारांचे मताधिक्य 18 हजार 500 आहे.
निवडणुक आयोगाच्या कागदपत्रांप्रमाणे महाराष्ट्रात 7.86 आणि झारखंड राज्यात 0.83 टक्के मतदान वाढले. हा मतदान टक्का वाढविण्यात निवडणुक आयोगाची चुक अशी झाली की, झालेले मतदान आणि मोजलेले मतदान जुळत नाही. महाराष्ट्रातील 92 विधानसभा मतदार संघात असे घडले आहे. गडबड अनेक लोकांनी मिळून केलेली आहे. पण गडबड करतांना त्यांना भान राहिले नाही की, मिठाईमध्ये साखर जास्त पडेल. निवडणुकीच्या मतदान डाटा जुळवला जाईल, त्याची तुलना होईल याबद्दल बोलतांना डॉ.प्यारेलाल गर्ग म्हणाले ओट फॉर डेमोक्रेसी(व्हीएफडी)ने दिलेल्या तक्रारीबद्दल एक शब्द सुध्दा उत्तर राजीवकुमार यांनी दिलेले नाही. प्यारेलाल गर्ग यांच्या मते,”मेरे मियॉं घर नही मेरेे को किसी का डर नहीं’ तसेच “जिसकी खाऊं बाजरी उसकी भरू हाजरी’ या दोन वाक्यांप्रमाणे राजीवकुमार वागत आहेत आाणि त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा मतदानावर दरोडा टाकला आहे. लोकसभेच्या 79 मतदार संघात सुध्दा हा मतांचा दरोडा पडला होता. यामुळे राजीवकुमार म्हणजे महाभारत काळातील शकुनी मामा आहेत. पण त्याही वेळेस भगवंताने सांगितले होते की, आपल्या हक्कासाठी लढणे आवश्यक आहे. अशीच लढाई आता देशात विरोधी पक्षाने तयार केली पाहिजे. कारण जनता आता बोलायला लागली आहे. राजकीय पक्षांनी त्या जनतेच्या बोलण्याचे भांडवल करून त्या आपल्या हक्काचा आंदोलनाच्या रुपाने डोंगर उभा करणे गरजेचे आहे. काल परवाच राहुल गांधी यांनी सुध्दा भारत जोडो यात्रा प्रमाणे या आंदोलनासाठी सुध्दा एक यात्रा काढण्याचे निश्चित केले आहे.
1952 मध्ये देश स्वतंत्र झाला तेंव्हा मी युवक होतो. तेंव्हा वाटले आता आपल्याला काही काम नाही. परंतू पुढच्या 7 -8 वर्षात माझ्या लक्षात आले की, देशाला माझी गरज आहे. देशाला पुढे नेण्यासाठी मी एकच नव्हे तर अनेक युवकांची गरज आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी काम केले आणि देश यास्थितीत आला. पण सन 2014 नंतर भारतीय प्रजासत्ताकाचा पाया आता हालायला लागला आहे. सत्ताधिश मंडळी विरोधकांना देशद्रोही म्हणत आहेत असेच घालमेल करून त्यांनी मागील 11 वर्ष सत्ता चालविली आहे. कोणी देशद्रोही म्हणेल तर घाबरण्याचे कारण नाही. कारण खऱ्या देशप्रेमींनाच देशद्रोही म्हटले जाते. एक राष्ट्र एक निवडुणकची कल्पना मांडणाऱ्यांना या निवडणुकीतून कळले असेल की, त्यांची घोषणा किती फोल आहे. ते जनतेला सुध्दा दिसत आहे. 99 विधानसभा मतदार संघात झालेले मतदान आणि मोजलेलीे मतदान जुळत नाही म्हणजे त्या राजीवकुमारच्या मशीनमध्ये नक्कीच काही तरी चुकीचे आहे.
डॉ.प्यारेलाल गर्ग यांनी आपल्या संबोधनात नांदेड लोकसभा मतदार संघाचा सुध्दा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, कॉंगे्रस पक्षाला 6 लाख 79 हजार 640 मतदान मिळाले. त्यातील 1449 मतदानाच्या फरकाने कॉंग्रेसने ही जागा जिंकली. कॉंगे्रसला मागील लोकसभेमध्ये सुध्दा जवळपास एवढेच मतदान मिळाले होते. म्हणजे वाढलेला टक्का हा घातक होता. तरीपण नांदेड लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार टपाली मतदानाच्या बळावर जिंकले. मागची लोकसभा निवडणुक जवळपास 40 हजार पेक्षा जास्त मताधिक्य घेवून जिंकली होती. नांदेड लोकसभा मतदार संघात 19 लाख 58 हजार 040 मतदार आहेत. त्यात विधानसभेच्या 9 मतदार संघामध्ये 8 लाख 90 हजार 913 एवढे मत महायुतीला मिळाले आणि 6 लाख 79 हजार 640 मते कॉंगे्रस आणि इतरांना मिळाली. हे सर्व विश्लेषण सांगत डॉ.प्यारेलाल गर्ग यांनी व्यक्त केलेले दु:ख आमच्या वाचकांसाठी सादर करत आहोत.
पत्रकार निलु व्यास यांनी डॉ.प्यारेलाल गर्ग यांची घेतलेल्या मुलाखतीची लिंक आमच्या लिखाणाच्या सामर्थ्यासाठी सोबत जोडली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!