नांदेड(प्रतिनिधी)-एका व्यक्तीला एटीएम जवळ फसवून त्याच्या कार्डच्या मदतीने फसवणूक करून दोन जणांनी 1 लाख 20 हजार 200 रुपये काढून घेतले आहेत. तपनकुमार रामदास दुपारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 मे 2023 ते 20 ऑक्टोबर 2023 दरम्यान श्रीनगर जवळील एसबीआय एटीएम नांदेडमध्ये साईनाथ दिगंबर अंबटवार(34) रा.बळीरामपुर आणि संदीप भिमराव बिरजे (25) रा.सिडको या दोघांनी तपनकुमार दुपारे यांच्या बॅंक खात्यातून 1 लाख 20 हजार 200 रुपये काढून त्याचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी केला. भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 498/2024 भारतीय दंड संहितेच्या कलम 408, 34 नुसार दाखल केला असून पोलीस अंमलदार राठोड अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 990 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation Jintropin (Somatropin) 10 IU Gene Science Pharmaceuticals Dosierung नजर चुकवून 50 हजार चोरले