नांदेड(प्रतिनिधी)-आयशाबाग, इदगाह मैदानाजवळ एका 25 वर्षीय व्यक्तीचा खून झाला आहे. गळ्यात स्कु्रड्रायवर खुपसून त्याचा खून करण्यात आला आहे. सय्यद हुसेन सय्यद मंजुर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजेच्या सुमारास सय्यद माजीद सय्यद मंजुर हा त्यांचा 25 वर्षीय भाऊ आपली बहिण सुलताना हिच्या घरी गेला होता. तेथे त्याला वाद मिटवायला होता. तेंव्हा आमेर खान गौस खान रा.लिंबराहिल ईदगाह मैदानाजवळ याने घरातील स्क्रुड्रायवर व बतई आणून घरासमोरच्या रस्त्यावर सय्यद माजी सय्यद मंजुर याच्या गळ्यात स्कु्रड्रायवर खुपसला. गंभीर जखमी अवस्थेतील सय्यद माजीद मरण पावला. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हा क्रमांक 1068/2024 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक गाढवे हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,433 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लावतो म्हणून 18 लाख 38 हजारांची फसवणूक लोकशाहीच्या सबलीकरणासाठी मतदान करा;बिरबल यादव यांचे जनतेला आवाहन