नांदेड(प्रतिनिधी)-दिवाळीच्या पुर्वी राज्य सरकारने 7 पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. त्यात नांदेड जिल्ह्याच्या उपविभाग बिलोली येथे शेख रफिक शेख चॉंद साहेब यांना नियुक्ती देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृहविभागाने जारी केलेल्या सात पोलीस उपअधिक्षकांच्या बदल्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील रिकाम्या झालेल्या बिलोली उपविभागात पोलीस उपअधिक्षक मुख्यालय जालना येथील शेख रफिक शेख चॉंद साहेब यांना नियुक्ती देण्यात आली आहे. इतर बदल्या झालेले सहा पोलीस उपअधिक्षक पुढील प्रमाणे आहेत. त्यांच्या नवीन नियुक्तीचे ठिकाण कंसात लिहिले आहे. राजकुमार बालाजी केंद्रे-पोलीस उपअधिक्षक मुख्यालय परभणी (उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत उपविभाग जि.हिंगोली), पांडूरंग बाबासाहेब गोफणे-पोलीस उपअधिक्षक मुख्यालय रायगड(उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर उपविभाग जि.भंडारा), रणजित नारायण सावंत-पोलीस उपअधिक्षक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती धाराशीव(उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर उपविभाग), श्रीकांत औदुंबर डिसले-पोलीस उपअधिक्षक महामार्ग सुरक्षा पथक छत्रपती संभाजीनगर(उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग उदगीर जि.लातूर), आनंद विष्णु चव्हाण-पोलीस उपअधिक्षक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर(उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली उपविभाग जि.भंडारा), प्रशांत राधाकृष्ण कुलकर्णी-पोलीस उपअधिक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर(उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा उपविभाग जि.भंडारा). Kanthak Suryatal Post Views: 1,719 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रा .राजू सोनसळे उद्या भरणार उमेदवारी अर्ज स्थानिक गुन्हा शाखेने तीन चोरटे पकडून तीन दुचाकी जप्त केल्या