नांदेड(प्रतिनिधी)-आज गांधी जयंती दिनी रावण बाबा वाघमारे यांच्या स्मृतीपित्यार्थ आंबेडकर आणि मातंग समाज या विषयावर प्रा.राजू सोनसळे यांचे व्याख्यान होणार आहे. आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिनी रावण बाबा वाघमारे स्मृतीपित्यार्थ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष बा.रा.वाघमारे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, सिडको (नवीन नांदेड) येथे डॉ.अण्णाभाऊ साठे सभागृहात सायंकाळी 5 वाजता या व्याख्यानमालेत प्रा.राजू सोनसळे यांच्यावतीने आंबेडकरवाद आणि मातंग समाज या विषयावर प्रकाश टाकला जाणार आहे. जनतेने या व्याख्यान मालेत मोठ्या संख्येत उपस्थित राहून विचारांच्या या पर्वणीत सहभाग घ्यावा असे आवाहन वाघमारे यांनी केले. Kanthak Suryatal Post Views: 924 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ज्येष्ठांबाबत आपले संस्कार सोडाल तर मग कायदा आपले कर्तव्य बजावेल -दलजित कौर जज तोंडी आदेशावरील स्वच्छता निरिक्षक दोन दिवस पोलीस कोठडीत