नांदेड(प्रतिनिधी)-शहरात स्वच्छता करणाऱ्या महिला सफाई कामगाराकडून 2 हजारांची लाच स्विकारणाऱ्या स्वच्छता निरिक्षकाला विशेष न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी दोन दिवस अर्थात 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 1 मध्ये तोंडी आदेशावर स्वच्छता निरिक्षकाचे काम पाहणाऱ्या अकबर खान उस्मानखान (47) याने एका महिला कामगाराला तुझे खाडे झाले आहेत. पण त्याचा अहवाल पाठवायचा नसेल तर 4 हजार रुपये लाचेची मागणी केली. या लाच मागणीची पडताळणी 1 ऑक्टोबर रोजी झाली तेंव्हा पंचासमक्ष अकबर खानने पाच हजारांची लाच मागीतली आणि त्यातील पहिला हप्ता 2 हजार रुपये चैतन्यनगर भागातील एका मेडीकलसमोर स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास अटक केली. आज 2 ऑक्टोबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस अधिकारी अंमलदारांनी महानगरपालिकेतील लाचखोर तोंडी आदेशावरील स्वच्छता निरिक्षक अकबर खानला न्यायालयात हजर केल्यानंतर न्या.सी.व्ही.मराठे यांनी त्यास दोन दिवस अर्थात 4 सप्टेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. Kanthak Suryatal Post Views: 866 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation प्रा.राजू सोनसळे यांच्या विचारातून आंबेडकरवाद आणि मातंग समाज या विषयावर व्याख्यान नवऱ्याच्या खूनी महिलेने नांदेड ग्रामीण पोलीसांनी मारहाण करून 26 हजार रुपये काढून घेतल्याची तक्रार न्यायालयात केली