नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केल्याचा प्रकार गवतवाडी ता.हदगाव येथे 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी घडला आहे. ज्ञानेश्र्वर परसराम झळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 सप्टेंबरच्या सकाळी 11.30 वाजता ते आणि त्यांचे मित्र संभाजी धुमाळे हे गल्लीत बोलत बसले असता ज्ञानेश्र्वर झळकेच्या आईचा ओरडण्याचा आवाज आला. तेंव्हा दोघे मित्र घरी गेले त्यांना पाहुन त्यांचे वडील निघून गेले. तेथे एक कुऱ्हाड पडलेली होती आणि आईच्या डोक्याल्या गंभीर मार लागलेला होता. त्यांना दवाखान्यात उपचारसाठी आणले असतांना उपचारादरम्यान लक्ष्मीबाई परसराम झळके (42) यांचा मृत्यू झाला. तामसा पोलीसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) नुसार परसराम सटवाजी झळके विरुध्द आपल्या पत्नीचा खून केल्याप्रकरणी गुन्हा क्रमांक 113/2024 दाखल केला आहे. तामसा येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक कमल शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक नरवटे अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,785 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation एका गुन्ह्याच्या तपसात बनावट कागदपत्र सादर करणाऱ्या रमेश पारसेवारसह आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल कुंटूर तांडा येथे 22 हजारांची चोरी