नांदेड(प्रतिनिधी)-कुंटूर तांडा येथे घडलेल्या एका चोरीच्या संदर्भाने तक्रारदाराने तिन जणांची नावे लिहुन तक्रार दिली आहे. या घटनेत 22 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. कुंटूर तांडा ता.नायगाव येथील गोमलुबाई भिखु जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 सप्टेंबरच्या सकाळी 11.30 ते 12 या वेळेदरम्यान निर्गुण लक्ष्मण राठोड, परमेश्र्वर लक्ष्मण राठोड दोघे रा.पांगरा तांडा ता.कंधार आणि दिलीप बालाजी राठोड रा.ढगारी तांडा ता.लोहा जि.नांदेड या तिघांनी त्यांच्या घराचे कुलूप दगडाने तोडून त्यातील 4 हजार रुपये रोख रक्कम, 3 ग्रॅम सोन्याची अंगठी 18 हजार रुपये किंमतीची असा एकूण 22 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. कुंटूर पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 205/2024 प्रमाणे दाखल केला असून पोलीस अंमलदार कंधारे अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 868 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पत्नीचा कुऱ्हाडीने केला खून पशुधन चोरी सुरूच आहे