नांदेड(प्रतिनिधी)-किनी ते भुरभोसी रस्त्यावर वनविभागाच्या गस्त करणाऱ्या वनरक्षकाची दुचाकी चोरट्यांनी चोरली आहे.
वनरक्षक बळवंत गंगाधर शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 सप्टेंबर रोजी ते भुरभोसी बीट भागातील जंगलात गस्त करत असतांना दुपारी 12.30 वाजता त्यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 सी.एल.3719 ही रस्त्या लगत लावून जंगलात गेले असतांना कोणी तरी चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली आहे. त्या दुचाकीची किंमत 1 लाख रुपये आहे. भोकर पोलीसांनी ही घटना भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) प्रमाणे गुन्हा क्रमांक 359/2024 प्रमाणे दाखल केली आहे. पोलीस अंमलदार लक्षटवार अधिक तपास करीत आहेत.
वनरक्षकाची दुचाकी चोरली
