नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलिसांनी ऑपरेशन क्रॅक डाउन अंतर्गत मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकून ४ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उप अधीक्षक रामेश्वर व्येंजने,सहायक पोलीस अधीक्षक शशांत एम. एन., पोलीस निरीक्षक संतोषश तांबे,महेश माळी,गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख,नरेश वाडेवाले,पोलीस अंमलदार विशाल माळवे,विष्णुकांत गुट्टे,सुधाकर मरदोडे,राहुल लाठकर,नागनाथ चापके,राजीव घुले,अदनान पठाण,अंकुश कांबळे व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, अरुणोदय नगर परिसरात लक्ष्मण पान शॉपजवळ काही जण जुगार खेळत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकून घटनास्थळी कारवाई केली. यावेळी ९ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून रोख रक्कम २२,५०० रुपये, जुगार साहित्य, ६ मोटारसायकली व ७ मोबाईल फोन असा एकूण ४,५२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पकडण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे गौतम दौलत जोंधळे (२५) अजिजखान इस्माईल खान पठाण (३५) राहुल गणपत मोरे (२३) सागर उत्तमराव सूर्यवंशी (३०) लक्ष्मण उत्तमराव चिंचोके (३५) स्वप्नील प्रकाश गजभारे (३२) अतुल भाऊराव कवडे (३२) विठ्ठल गोविंद धोत्रे (३८) नंदकिशोर प्रल्हाद कदम (३०) अशी आहेत. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 654 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नालेसफाई की फोटोसेशन? डॉ.आंबेडकर नगरमध्ये महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह धिरेंद्र कृष्ण शास्त्रीजींच्या अंधश्रध्देचा प्रसार करणारे देवेंद्र फडणवीस सुध्दा अंधश्रध्दा निर्मुलन कायद्याचे गुन्हेगार आहेत-प्रा.शाम मानव