नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील सन 2024 च्या विधानसभा निवडणुका लागण्याच्या पार्श्र्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी एक पत्र काढून शनिवार, रविवारी सुध्दा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणारी सर्व कार्यालये सुरू राहतील आणि लवकरात लवकर कामे संपवावी असे आदेश जारी केले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी जारी केलेल्या एका पत्रानुसार पुढील आठवड्यात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचीची घोषण होवू शकते. त्या अनुशंगाने उद्या दि.21 सप्टेंबर शनिवार आणि 22 सप्टेंबर रविवार या दोन्ही दिवशी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारी सर्व कार्यालये सुरू राहतील असे म्हटले आहे. निवडणुकांच्या पार्श्र्वभूमीवर आचार संहिता लागू झाल्यानंतर बऱ्याच कामांना पुर्ण करण्यात अडचणी येतात. त्यामुळे शनिवार आणि रविवार या दिवशी कार्यालय सुरू ठेवून कामे त्वरीत पुर्ण करावी असे आदेशात म्हटले आहे. Kanthak Suryatal Post Views: 891 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कौशल्यातून करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी केंद्राचा उपयोग घ्यावा- अभिजीत राऊत जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस क्रिडा स्पर्धेत अपूर्वा रोकडे जिल्ह्यात प्रथम