नांदेड(प्रतिनिधी)-ऑपरेशन फ्लॅश आऊटदरम्यान पोलीस अधिक्षकांचे पथक आणि उमरी पोलीसांनी उमरी तळेगाव रस्त्यावर दोन संशयीत ट्रक पकडले त्यामध्ये स्वस्त धान्याचा गहु आणि तांदुळ संशयीत असल्याचे पोलीसांनी प्रसिध्दी पत्रकात पाठविले आहे. 4 लाखांचा गहू आणि 1 लाखांचा तांदुळ तसेच 40 लाखांच्या दोन गाड्या असा 45 लाखांचा संशयीत मुद्देमाल पोलीसांनी सध्या उमरी पोलीस ठाण्यात उभा केला आहे. अवैध कामकाजाचे समुळउच्चाटन करण्यासाठी नांदेड पोलीस अधिक्षकांनी 6 विशेष पथके स्थापन केली आहेत. त्यानुसार विशेष पथकातील पोलीस उपनिरिक्षक बी.एम.हालसे, उमरीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अंकुश माने, सचिन आरमाळ, पोलीस अंमलदार पी.एम.जुने, एम.बी.कांबळे, बी.डी.लामतुरे, आर.के.मुळे, बी.एम.जाधव, टी.व्ही.केंद्रे, आर.पी.जाधव, ए.व्ही.हैबतकर, अब्दुल रियाज, सय्यद अजमल, दत्तात्रय गुरूपवार आदींनी गस्त करत असतांना उमरी तळेगाव रस्त्यावर ट्रक क्रमांक एम.एच.26 बी.ई.7337 थांबवला. त्यामध्ये स्वस्त धान्याचे गहु असल्याचे संशय पोलीसंाना आला. तसेच ट्रक क्रमांक एम.एच.26 बी.ई.7835 पोलीस पथकाने थांबविला आणि त्याची तासणी केली तें्हा त्यात स्वस्त धान्याचा तांदुळ असल्याचा संशय पोलीस पथकाला आला. पोलीस पथकाने हे संशयीत स्वस्त धान्याचे साहित्य असलेले दोन ट्रक पोलीस ठाणे उमरी येथे उभे केले आहे. काल सुध्दा पोलीसांनी रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असाच संशयीत स्वस्त धान्याचा साठा पकडला आहे. या दोन ट्रकची किंमत 40 लाख, गव्हाची किंमत 4 लाख आणि तांदळाची किंमत 1 लाख असा एकूण 45 लाखांचा मुद्देमाल पोलीसांनी पकडला आहे. पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, धर्माबादचे पोलीस उपअधिक्षक प्रशांत संपते आदींनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,526 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तीन पिस्टलसह चार जीवंत काडतुस पकडले ईद-ए-मिलाद सणानिमित्त 16 सप्टेंबरची सुटी कायम