नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने ग्रामीण हद्दीतील दुध डेअरी परिसरात संशयीत फिरणाऱ्या युवकांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे तीन पिस्टलसह चार जीवंत काडतुस आढळून आले. इतवारा पोलीसांनी दोघांनाही ताब्यात घेवून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. 13 सप्टेंबरच्या रात्री वसरणी भागातील दुध डेअरी परिसरात दोन युवक संशयास्पद हालचाल करत असल्याचे इतवारा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या लक्षात आले. हे पथक रात्री गस्तीवर होते. यावेळी त्यांनी या दोन्ही संशयीत युवकांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली. यावेळी त्यांच्याकडे बेकायदेशीर रित्या तीन गावठी पिस्टल व चार जीवंत काडतूस आढळूनआले. यामध्ये बलविंदरसिंग प्रतापसिंग जाधव (21) रा.यात्रीनिवास नांदेड आणि शेख आदिल शेख शकील (25) रा.मदीना मस्जिद रहिमपुर या दोघांना पोलीसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातील तीन गावठी पिस्टल आणि चार जीवंत काडतुस असा 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोघांविरुध्द ही ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,442 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ईद-ए-मिलादुन्न मिरवणूक 16 सप्टेंबर ऐवजी 19 सप्टेंबर रोजी संशयीत स्वस्त धान्य भरलेले दोन ट्रक पकडले