नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेच्या गळ्यातील सोन्याचे पदक तोडून पळणाऱ्या एक महिला आणि एक विधीसंर्षग्रस्त भाग्यनगर पोलीसांनी काही तासातच अटक करून चोरीला गेलेले 7 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पदक त्यांच्याकडून जप्त केले आहे. दि.10 सप्टेंबर रोजी छत्रपती चौकातून एका कटलरी व्यवसायीक महिलेच्या नातीच्या गळ्यातून सोन्याचे पदक तोडून दोन महिला पळाल्या होत्या. पोलीसांना ही माहिती मिळाल्यावर भाग्यनगर पोलीस तेथे पोहचले आणि त्यांनी काही तासातच शेख हिना उर्फ चंदा शेख जमाल (30) रा.गौतमनगर सांगवी आणि ह.मु.क्रांतीनगर पुर्णा आणि तिच्या सोबत एक विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात घेतला. या महिलेकडून मिनाक्षी गोविंदरवार यांच्या नातीचे गळ्यातील सोन्याचे पदक 7 हजार रुपये किंमतीचे जप्त केले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार गजानन किडे हे करीत आहेत. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव यांनी भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक रामदास शेंडगे, पोलीस उपअधिक्षक के.बी.केजगिर, पोलीस अंमलदार विशाल माळवे, गजानन किडे, हनवता कदम आणि सविता केंद्रे यांच कौतुक केले आहे. संबंंधीत बातमी… बालिकेच्या गळ्यातील सोन्याचे पदक महिलांनी तोडले Kanthak Suryatal Post Views: 1,454 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गुंगी आणणाऱ्या औषधी गोळ्या पकडल्या नांदेडला लागलेल्या गद्दारीचा डाग पुसून काढा-खा.संजय राऊत