नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील वाघी रोडवर असलेल्या सैलाबनगर भागात आज सकाळी टोलेजंग इमारतीच्या मालकाचा मृतदेह त्यांच्याच घराच्या हॉलमध्ये सापडला. त्यांच्या शरिरावर काही जखमा आहेत. पोलीस विभाग या संबंधाने शोध घेत आहेत.
नांदेडच्या वाघी रोड भागातील सैलाबनगर येथे महेमुद फंक्शन हॉलच्या शेजारी शेख युनूस शेख पाशा(45) यांचे घर आहे. त्यांचा मृत्यदेह सकाळी 9 वाजता सर्वप्रथम त्यांच्या मुलाने पाहिला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका सी.एम.वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.डी.वटाणे अनेक पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले. शेख युनूस शेख पाशा यांची खडकपुरा भागात मदीना हॉटेल आहे. घटना जनतेत पसरली तशी बघ्यांची गर्दी वाढली. त्यामुळे पोलीसांच्या कामात सुध्दा बऱ्याच अडचणी आल्या. पाऊस पडत आहे. पावसाने सुध्दाा पोलीसांच्या कामाच्या गतीला औरोध तयार केले. पण पोलीस हे शेवटी पोलीसच असतात. त्यांनी आता वृत्तलिहिपर्यंत बऱ्याच कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केल्या आहेत.
शेख युनूसच्या मृत्यूचे गुढ उकलण्याची जबाबदारी पोलीस विभागावर आहे. शेख युनूस यांचे घर टोलेजंग आहे. तेथे सीसीटीव्ही कॅमेरेपण लावलेले आहेत. त्याचाही अभ्यास सुरू आहे. पण शेख युनूसच्या घरात शिरुन मारेकऱ्याने केलेली हत्या नक्कीच आव्हाण आहे.
One thought on “मदीना हॉटेलच्या मालकाची त्यांच्याच घरामध्ये हत्या”