नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथे जुगारअड्ड्यावर छापा टाकल्यानंतर मी प्रतिष्ठीत नागरीक आहे. माझ्या जिवाचे काही बरेवाईट करून घेईल, लोहा कोर्टातून खोटे गुन्हे दाखल करील अशी धमकी जुगारामध्ये पकडलेल्या एका व्यक्तीने दिल्या प्रकार घडला आहे.
लोहा येथील पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रामचंद्र रोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता हळदव शिवारातील एका जुगार अड्ड्यावर छापा मारला. त्या ठिकाणी मारोती व्यंकटी शेळके (39), शेख रफीक शेख अफसर (21), राजू दाढेल, चंद्रकांत पवार, दिपक हरगावकर सर्व रा.इंदिरानगर लोहा अशा पाच जणांना पकडले. त्यांच्याकडून दुचाकी गाडी, मोबाईल, 52 बदकछाप पत्ते आणि 5 हजार 100 रुपये रोख रक्कम असा 1 लाख 5 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. छापा टाकला तेंव्हा मारोती शेळके या व्यक्तीने सांगितले की, मी प्रतिष्ठीत नागरीक आहे. मी माझ्या जिवाचे बरेवाईट करून घेईल, लोहा पोलीसांविरुध्द न्यायालयातून खोटे गुन्हे दाखल करील असा म्हणाला होता हे सुध्दा तक्रारीत लिहिले आहे. पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या आदेशानंतर हा गुन्हा क्रमांक 308/2024 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार बालाजी लाडेकर हे करणार आहेत.