नांदेड (प्रतिनिधी) – तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाने सोशल मीडियावर गुरुद्वाराच्या नावाने सुरू असलेल्या बनावट फेसबुक, युट्यूब आणि इन्स्टाग्राम खात्यांविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.याब अर्जावर गुरुद्वारा बोर्ड अधीक्षकांची स्वाक्षरी आहे. गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक यांच्या स्वाक्षरीने पोलिस अधीक्षक, नांदेड यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुरुद्वारा बोर्ड ही महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार कार्यरत असलेली धार्मिक संस्था आहे. संस्थेच्या नावाने काही अज्ञात व्यक्तींनी सोशल मीडियावर विविध बनावट खाती तयार करून दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. निवेदनानुसार, संबंधित खाती फेसबुक, युट्यूब आणि इन्स्टाग्रामवर सक्रिय असून त्याद्वारे गुरुद्वारा बोर्ड व संस्थेच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या खात्यांवरून प्रसारित होणाऱ्या माहितीचा संस्थेशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गुरुद्वारा बोर्डाने पोलिस प्रशासनाला संबंधित सोशल मीडिया खात्यांची चौकशी करून ती तात्काळ बंद करण्याची तसेच जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात संबंधित सोशल मीडिया पेजेस व चॅनेलची यादीही निवेदनासोबत जोडण्यात आली आहे.गुरुद्वार श्री सचखंड हजूर अबचलनगर साहिब या नावाचा खोटा वापर केला जात आहे. आणि भाविकांकडून देणगीच्या नावावर वसुली केली जात आहे.दरम्यान, या प्रकरणामुळे धार्मिक संस्थांच्या नावाचा गैरवापर करून सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्याच्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली जात असून पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. Kanthak Suryatal Post Views: 874 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation काही दिवसातच दूध १००,पेट्रोल १५०,गॅस ४००० रुपयांना मिळेल संगीता गणेशराव बारडकर यांचे निधन