नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव येथील अजमेर येथे गेलेल्या एका कुटूंबाचे बंद घर फोडून चोरट्यांनी त्यातील 3 लाख 49 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. खदीर खान वहिद खान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 ऑगस्ट रोजी ते अजमेर येथे देवदर्शनासाठी गेले होते. पण त्यांचे देवदर्शन अर्धवटच राहिले.26 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजता त्यांना घरफोडल्याची माहिती मिळाली. त्यांनी येवून तपासणी केली असता घरातील 8.2 तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे किंमत 1 लाख 14 हजार 500 रुपये, 87 तोळे चांदीचे दागिणे किंमत 85 हजार रुपये आणि 1 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 3 लाख 49 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. हदगाव पोलीसांनी हा चोरीचा प्रकार गुन्हा क्रमांक 257/2024 नुसार दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक रायबोळे हे अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 866 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation खा.वसंत चव्हाण यांच्या अंत्यविधी कार्यक्रमासाठी गेलेल्या व्यक्तीची दुचाकी चोरली लोहा येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकला तेंव्हा पोलीसांना धमक्या