नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने पाच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश आज जारी केले आहेत. त्या आदेशावर गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांची डिजीटल स्वाक्षरी आहे.
राज्य शासनाच्या गृह विभागाने आज पाच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात सहपोलीस आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई येथील निसार तांबोळी यांना पोलीस सहआयुक्त नागपूर शहर या पदावर पाठविले आहे. पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या शारदा राऊत यांना विशेष पोलीस महानिरीक्षक सागरी सुरक्षा व विशेष सुरक्षा राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. त्याठिकाणी कार्यरत असलेले दिलीप सावंत यांच्या सेवानिवृत्तीच्या दि. ३१ ऑगस्ट रोजी २०२४ पासून त्यांची नियुक्ती आंमलात येईल. भंडाराच्या पोलीस अधीक्षक लोहित मसानी यांना सहायक पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था मुंबई या पदावर पाठविले आहे. वर्धाचे पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांना पोलीस अधीक्षक भंडारा या पदावर नियुक्ती दिली आहे. नुरूल हसन यांची थोड्याच दिवसांपुर्वी १३ ऑगस्ट रोजी समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ११ नवी मुंबई येथे नियुक्ती झाली होती. अपर पोलीस अधीक्षक नंदूरबार येथील निलेश तांबे यांची नियुक्ती काही दिवसांपुर्वी प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे नियुक्ती झाली होती, पण ती बदली बदलून ३१ ऑगस्ट रोजी रिक्त होणार्या पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नागपूर येथे नियुक्ती देण्यात आली आहे
.