नांदेड(प्रतिनिधी)-मनरेगा अंतर्गतचे 7 मस्टर पंचायत समिती किनवट येथे सादर केल्यानंतर त्यावरील पुढील कार्यवाही करण्यासाठी कंत्राटी ऑपरेटरने प्रत्येक मस्टरसाठी 500 रुपये 3500 रुपये लाच स्विकारल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला जेरबंद केले आहे. एका तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार मौजे शिरपुर ता.किनवट येथील ग्राम पंचायत हद्दीतील मनरेगा अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे 7 मस्टर त्यांनी पंचायत समिती किनवट येथे सादर केले. या मस्टरवर पुढील कार्यवाही करण्यासाठी प्रत्येक मस्टरसाठी 500 रुपये असे एकूण 3 हजार 500 रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराला लाच देण्याची मानसिकता नसल्याने त्याने 16 आगस्ट रोजी लाच मागणीची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांच्याकडे दिली. या सात मस्टरवर पुढील कार्यवाही करण्यासाठी प्रत्येक मस्टरसाठी 500 रुपये अशी 3 हजार 500 रुपयांची लाच मागणी कंत्राटी ऑपरेटर अविनाश विश्र्वनाथ भुरेवार (32) याने पंचासमक्ष सुध्दा केली. आज 20 ऑगस्ट रोजी 3500 र ुपये लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अविनाश विश्र्वनाथ भुरेवारला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुध्द किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नांदेड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक संदीप पालवे, पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक गजान बोडके आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी ही कार्यवाही पुर्ण केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे शासकीय काम करण्यासाठी कोणी लोकसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने कोणी खाजगी इसम (एजंट) यांनी कायदेशीर फि व्यतिरिक्त अन्य रक्कम अर्थात लाचेची मागणी केली तर त्या संदर्भाने दुरध्वनी क्रमांक 02462-253512 आणि टोल फ्रि क्रमांक 1064 वर माहिती द्यावी. Kanthak Suryatal Post Views: 1,968 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation काल रात्री नांदेड पोलीसांनी शहरभर राबविले ऑलआऊट ऑपरेशन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा दौरा